सुपरस्टार सिंगर सीझन 1 च्या जबरदस्त यशानंतर सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन घेऊन येत आहे त्यांचा स्वतःचा फॉरमॅट असलेला लहान मुलांचा गायन रियाल...
सुपरस्टार सिंगर सीझन 1 च्या जबरदस्त यशानंतर सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन घेऊन येत आहे त्यांचा स्वतःचा फॉरमॅट असलेला लहान मुलांचा गायन रियालिटी शो, सुपरस्टार सिंगर सीझन 2. सिंगिंग का कल, सुपरस्टार सिंगर सत्र 2 मध्ये देशभरातील काही असामान्य बाल प्रतिभेचा आविष्कार बघायला मिळेल. संगीताची उपजत जाण आणि अभिव्यक्ती आणि संगीताबद्दल अपार निष्ठा असलेल्या या स्पर्धकांना मार्गदर्शन करतील नियुक्त पॅनल मधील कॅप्टन! इंडियन आयडॉल 12 च्या अंतिम फेरीत पोहोचलेली आणि भारत की बेटी या नावाने ओळखली जाणारी सायली कांबळे सुपरस्टार सिंगर 2 मध्ये अरुणिता कांजीलाल आणि पवनदीप बरोबर कॅप्टन म्हणून जबाबदारी सांभाळणार आहे.
गोड आणि सुरेल गळ्याच्या सायलीचा आलेख इंडियन आयडॉलच्या प्रवासात सतत उंचावत गेलेला प्रेक्षकांनी पाहिला होता आणि आता ती आपले ज्ञान आणि अनुभव यांचा उपयोग देशभरातून आलेल्या छोट्या गायकांना शिकवण्यासाठी करण्यास सज्ज झाली आहे.
कॅप्टन झाल्याचा आपला आनंद व्यक्त करताना सायली म्हणाली, “गायन हीच माझी ओळख आहे. इंडियन आयडॉल ही माझ्या कारकिर्दीची सुरुवात होती. त्या शो चे आणि सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनचे माझ्यावर ऋण आहे. ते माझ्या विकासातले भक्कम आधारस्तंभ होते. माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल आणि लहान मुलांचा गायन रियालिटी शो, सुपरस्टार सिंगरमध्ये कॅप्टन बनण्याची संधी दिल्याबद्दल मी कृतज्ञ आहे. सुपरस्टार सिंगर च्या पहिल्या सत्रातील एकापेक्षा एक छोट्या गायकांनी जनमानसावर आपला ठसा उमटवला होता. मला देखील तो कार्यक्रम खूप आवडत असे. आता ‘सिंगिंग का कल’चे मार्गदर्शन करण्याची संधी मिळाल्याने मी भारावून गेले आहे. इंडियन आयडॉल मधील माझे सह-स्पर्धक पवनदीप राजन, दानिश खान आणि अरुणिता कांजीलाल यांच्याबरोबर पुन्हा एकदा एका मंचावर काम करण्याची कल्पना हा प्रवास आणखी आनंददायक करणारी आहे. त्यांच्यासोबत हा मस्त प्रवास कधी सुरू होतो, याची मी वाट बघत आहे. शिवाय सलमान अली याच्याबरोबर काम करायला मिळणार असल्याने मी आणखीनच खुश आहे, कारण त्याच्याकडून मला खूप प्रेरणा मिळाली आहे. मी त्याचा संघर्ष पाहिला आहे आणि त्याच्या पिढीतील एक उत्कृष्ट गायक म्हणून त्याने स्वतःला कसे सिद्ध आणि प्रस्थापित केले हे मी पाहिले आहे. त्याच्याशी स्पर्धाच नाही; तर त्याच्याकडून शिकण्यासाठी मला ही एक संधी मिळाली आहे. लहान मुलांना योग्य मार्गदर्शन करण्यास आणि त्यांच्या गाण्यात आत्मविश्वास आणण्यास मी सज्ज आहे.”
पाहण्यासाठी ट्यून इन करा, सुपरस्टार सिंगर सीझन 2, 23 एप्रिल 2022 पासून रात्री 8.00 वाजता फक्त सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवर प्रसारित होईल!
No comments